
सेलू शहरात टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव तसेच डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने सेलू रेल्वे स्टेशन परिसरात आणि गरजू लोकांसाठी शाल व फळे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन संदीप भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी आष्टी तालुका अध्यक्ष अजय भदर्गे, अमोल राठोड, नितीन भदर्गे, वैभव पांचाळ, विश्वनाथ ढोबळे, दत्ता कोथंबीर, पंकज सुरवसे, सुमित अंभोरे, गोल्डी मकसे, ऋषीं पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
