सेलू येथे सिंधी समाजाची अमित बघेल विरोधात कार्यवाहीची मागणी

सेलू (प्रतिनिधी) – रायपूर, छत्तीसगड येथील अमित बघेल यांनी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान श्री झुलेलाल साई यांच्या बद्दल सामाजिक माध्यमांवर अपशब्द वापरल्याची गंभीर घटना घडली आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरातील सिंधी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील सिंधी समाज बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकारी सेलू तसेच तहसीलदार शिवाजी मगर यांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे अमित बघेल यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित सिंधी समाज बांधवांनी सांगितले की, धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे समाजात असंतोष पसरतो. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button