नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार..

सेलू : नूतन विद्यालयातील इयत्ता आठवी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आर्यन वैद्य, भक्ती सोनी, पियुष सवलके, श्रेयश घुगे, गोपाळ कुलकर्णी व विनया घुले यांचा गुरुवारी, ९ जुलै रोजी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी प्रवेश पात्र माजी विद्यार्थी कृष्णा विष्णू घोडके तसेच उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड व गणेश माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती
“अभ्यासाचे नियोजन, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन व आत्मविश्वास यांच्या बळावर आय.आय. टी. सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवता येते व मोठी स्वप्न पूर्ण करता येतात असे प्रतिपादन घोडके यांनी केले. शाळेतर्फे कृष्णा घोडके यांचा तसेच वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक श्री.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी प्रशांत नाईक, विजय धापसे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील तोडकर व गजानन मुळी तसेच अरविंद अंबेकर, शैलजा कवुटकर, बाळू बुधवंत, प्रभू भुसारे, काशिनाथ पल्लेवाड आणि शिक्षक उपस्थित होते.

सेलू येथील नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संतोष पाटील, कृष्णा घोडके आणि मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button