गुरुकृपा करिअर अकॅडमीत MHT-CET 2026 गुणवंतांचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात संपन्न

सेलू |

सेलू येथील गुरुकृपा करिअर अकॅडमी गेल्या 27 वर्षापासून विश्वासाने विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम निकाल नेहमीच परभणी जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचे म्हणून चर्चित असते अकॅडमीच्या वतीने MHT-CET 2026 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 5 जुलै) साई नाट्यगृह, सेलू येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी श्री गुरुगोविंद सिंह अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे संचालक डॉ. मनेश कोकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले

तर अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्यचे संचालक डॉ. महेश पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, अभियांत्रिकी शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि भविष्यातील आव्हानांबाबत मार्गदर्शन केले.

MHT-CET 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करत राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या व्हिजन इंग्लिश स्कूल, सेलूचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मनीष बोरगांवकर, प्रा. वैभव खरात, प्रा. साजिद शेख आणि प्रा. शशिकांत बिहाडे यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश बोरगांवकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button