शारदा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकान्हेकर दांम्पत्याच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रममुळावेकर यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्यासाठी पाच हजारांची देणगी..

(सेलू) येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात कै किशनराव व कै.सौ. राधाबाई यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त सोमवार दिनांक 06 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर, डॉ राजेंद्र मुळावेकर, डॉ किशोर जवळेकर, मुख्याध्यापक निळकंठ पाटील, संचालक सुनीलबापु डख, चंद्रशेखर नावाडे, प्रल्हादराव कान्हेकर, एकनाथराव पौळ, सुनील गायकवाड, श्रीराम कान्हेकर, लक्ष्मण कान्हेकर, अनिकेत कान्हेकर, मझहर पठाण यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते युवराज पौळ, काळुंके, सार्थक साबळे ,साई कोक्कर, ओमकार मिंड, कार्तिक सावंत, सिद्धांत सावंत, वैष्णवी गोरे, आदी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर यांनी शैक्षणिक साहित्या साठी शाळेला पाचहजार रुपयांची देणगी जाहीर केली, तसेच वाचणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी वाचणालयात मोफत वाचण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी. शिंदे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर अभिमान पाईकराव यांनी आभार मानले. प्रल्हादराव कान्हेकर यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या कु.ईश्वरी राठोड, कल्याणी आढे, ममता राठोड व प्रतिक राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका सौ उषा कामठे, रोहीदास चव्हाण, सौ अर्चना पठारे, सोमेश शिंदे , आनंद देवधर आर्दींनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button