काजळी रोहीणा ता. सेलु – अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची पाहणी

काजळी रोहीणा (ता. सेलु) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली.

पाहणीदरम्यान पालकमंत्री बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली. पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणावरचे नुकसान लक्षात घेता तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, योग्य मदत आणि दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

या पाहणीवेळी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button