“सेलूमध्ये अतिवृष्टीचा कहर – नुकसानग्रस्तांना त्वरित मदतीचे आश्वासन”

📍 सेलु
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सेलु तालुक्यातील शेती, घरे तसेच सार्वजनिक व्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आज सेलु येथे तालुका व उपविभागातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करून, शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्याचे आदेश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, “शेतकरी व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. आपल्या संकटाच्या या काळात मी आपल्या सोबत आहे.”

बैठकीत पीक विमा संबंधित माहितीचा आढावा घेण्यात आला. तसेच, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, विस्कळीत झालेला वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करणे यासह कोणतीही प्रशासकीय दिरंगाई होऊ नये, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

👉 शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करून त्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button