सेलू उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन

सेलू (जि. परभणी) – तालुक्यातील रुग्णांना विशेष तज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे वैद्यकीय व दंत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २७ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणार असून त्याचे उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. मेघना दिदी साकोरे बोर्डिकर यांच्या हस्ते होणार आहे.

पहिल्या दिवशी सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गरजू रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येतील. विशेषत: महिला रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरामध्ये मिळणाऱ्या सेवाः
✔️ भिषक, शल्यचिकित्सक, बालरोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंतचिकित्सक व बधिरकर्ण तज्ञ यांची सेवा
✔️ नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया
✔️ कर्करोग (स्तन व गर्भाशय मुख) तपासणी
✔️ मानसिक आरोग्य तपासणी
✔️ उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग व इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासण्या व उपचार
✔️ स्त्रीरोग निदान, गर्भपिशवीसंबंधी आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया
✔️ सर्व रक्त तपासण्या, X-Ray, USG, ECG इत्यादी तपासण्या

या शिबिरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय परभणी, सामान्य रुग्णालय परभणी तसेच सेलूतील खाजगी तज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत.

या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, बाह्य निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. चौधरी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button