
सेलू (ता. सेलू, जि. परभणी) – तालुक्यातील झोंडगाव व परिसरात दिनांक 16, 17 व 18 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर झोंडगाव ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार, सेलू यांना पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या हंगामी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी संबंधित महसूल विभागाकडून पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांनी केली आहे.

सेलू तहसील येथील नायब तहसीलदार गजानन इनामदार यांना निवेदन देते वेळी रामभाऊ सुरेशराव पवार,अमरदिप उमेशराव पवार, आकाश प्रकाशराव पवार,कुलदीप संजयराव पवार,राजेंद्र पंडितराव पवार,धनंजय राजेंद्र पवार,हनुमान अंकुश पवार,मंगेश प्रल्हादराव पवार,नितीन भारत पवार, अभिजीत झुंबरराव पवार, संतोष जनार्दन पवार, धीरज राजेंद् पवार, लक्ष्मण विजयराव पवार ,महादेव दत्तराव पवार, अरुण रंगनाथ पवार,रमेश बापुराव पवार, ज्ञानेश्वर पवार, अमोल बाबासाहेब पवार व ईतर शेतकरी उपस्थित होते.

👉 शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे तातडीने पंचनामे होऊन योग्य नुकसानभरपाई मिळणे हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे..!