
सेलू (प्रतिनिधी) : “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ सेलू येथे मोठ्या उत्साहात झाला. दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी, उपचार सेवा तसेच पोषण यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या अभियानाचे उद्दिष्ट राष्ट्राच्या आरोग्य दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडविणे व महिलांचे आरोग्य अधिक सक्षम करणे हे आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मोफत तपासणी व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
आज या केंद्राचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी भाजपा उपजिल्हाध्यक्ष श्री. शिवहरी शेवाळे, तालुकाध्यक्ष श्री. गणेशजी काटकर, शहराध्यक्ष श्री. अशोक शेलार, तालुका महिला अध्यक्ष सौ. ज्योतीताई मोगल, उपतालुकाध्यक्ष श्री. नामदेव काका आवटे, सहचिटणीस श्री. कृष्णा गायकवाड, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब काजळे यांची प्रमुख उपस्थित होती
तसेच उपशहराध्यक्ष श्री. प्रमोद शेरे, श्री. अरुणराव दोड, श्री. सुनील चव्हाण, श्री. अजितराव मोगल, गजानन कदम आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
वैद्यकीय मार्गदर्शनासाठी उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील डॉ. गोळेगावकर, डॉ. नकाते, डॉ. भुरेवार यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय कर्मचारीवर्गाने या अभियानात सहभाग नोंदवला.
👉 महिलांच्या सर्वांगीण आरोग्य संरक्षणासाठी हा उपक्रम एक मोठे पाऊल मानले जात असून, यामुळे तालुक्यातील महिलांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.