दूधना नदीत वाहून गेलेल्या दोघांचे ही सापडले मृतदेह.

अपत्कालीन व्यवस्थापनेचे दोन दिवसानंतर चे प्रयत्न ठरले यशस्वी.

सेलू तालुक्यातील राजवाडी- ब्राह्मणगावच्या मधून वाहणाऱ्या दुधना नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकी वरील दोघांपैकी एकाचा मृतदेह अवघ्या अर्ध्या तासात आपत्कालीन व्यवस्थापनेच्या कर्मचारी यांच्या हाती लागला होता. मात्र 20 ऑगस्ट रोजी दुसरा मृतदेह शोधण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न यशस्वी ठरले आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील राजवाडी- ब्राह्मणगावच्या मधून वाहणाऱ्या दुधना नदीत लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या आठ दरवाज्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते.यामुळे सेलू वालूर रस्त्यावर असलेल्या दुधना नदीच्या लहान पुलावरून पाणी वाहत असताना मारुती रामभाऊ हरकळ वय ५० वर्षे राहणार वालूर, छबुराव श्रीरंगराव जावळे वय ४५ वर्षे राहणार गुळखंड यांनी दुचाकी वरून रस्ता ओलांडत असताना दुधना नदीच्या पाण्यात १९ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता वाहून गेले. घटनास्थळी असलेल्यांनी मदतीसाठी केलेले प्रयत्न आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. घटनेची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थ महसूल आणि पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र नंतर अंधार पडल्याने मदतीसाठी हाती घेतलेली मोहीम थांबविण्यात आली. बुधवार २० ऑगस्ट रोजी पहाटे आठ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार ,नायब तहसीलदार विजय मोरे, हरीश टाक ,मंडळाधिकारी सारिका हेगडे, तलाठी सुजित बारवाल, सचिन गायकवाड, ग्रामसेवक एम. व्ही. वाहुळे ,पोलीस हवालदार मुकेश बुधवंत, आपत्ती व्यवस्थापनाचे शरीफ खान ,सोनाजी खिल्लारे, बलराम वाव्हळे ,राम दहे, शेख कलीम आदीसह सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेत मारुती रामभाऊ हरकळ वय ५०वर्षे राहणार वालूर यांचा मृतदेह सकाळी नऊ वाजता डुघरा कवडधन शिवारात आढळून आला. त्यानंतर सायंकाळी दुसराही मृतदेह शोध मोहीम सुरू असताना आपत्कालीन पथकाचे प्रयत्न यशस्वी ठरले आहे.

सेलू तालुक्यातील राजवाडी -ब्राह्मणगाव या गावांमधून जाणाऱ्या दुधना नदीच्या पुलावरून दुचाकी वरून जाणाऱ्या दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडून घडलेल्या या घटनेमुळे अनर्थ ओढावला आहे . परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी सर्वांना उगीच धाडस करू नका असे आवाहन केले आहे. तसेच या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत संबंधिताचे सांत्वन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button