
परभणी ता.20 मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे
येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची राज्याच्या महसूल विभागाने आज मुंबई तडकाफडकी बदली केली.
श्री.गावडे यांना बुधवारी सकाळी या बदली संदर्भातील आदेश प्राप्त झाला. गावडे यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे ठिकाण कळाले नाही.
चव्हाण यांच्या बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी या आदेश काढला
दरम्यान नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे एमपीएसीमधून 1993 साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ते मुळचे भोळी ( ता.खंडाळा, जि.सातारा) येथील आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या श्री.चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज (1998÷-2001), इचलकरंजी (2003-05) येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, शेती महामंडळ मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सामान्य प्रशासनचे उपायुक्त म्हणून काम केले.
