अंबेकर ग्रंथालयाचा वाचक मेळावा संपन्न

सेलू (प्रतिनिधी)
रा.दा.अंबेकर सेलू ग्रंथालयाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट वाचक पुरस्काराचे वितरण नुकताच संपन्न झाला. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष या वर्षी चा पुरस्काराच्या मानकरी शुभदा गोळेगावकर व तुकाराम खिल्लारे हे ठरले. कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयाच्या सभागृहास कै.रुपेश नावाडे यांचे नाव देण्यात आले. या प्रसंगी अभिजित नावाडे आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले .प्रास्ताविक शैलजा अंबेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कल्याण वसेकर यांनी केला .अध्यक्षस्थानी डॉ मिलिंद देशपांडे होते .प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महालिंग गुजर आणि श्री अरूण जोशी यांनी मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या कामाचे कौतुक करून उत्साह वाढवला. संस्थेच्या वतीने आभार प्रदर्शन स्मिता अंबेकर यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय अंबेकर ,दुष्यंत कुमार वसेकर, विजया जोशी, नवल सराफ, स्वप्ना जोशी ,जयेश देशपांडे, अमित अंबेकर ,ओंकार अंबेकर, ईशा अंबेकर ,दिक्षा वाघ ,कविता ससाणे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button