
सेलू तालुक्यात दिनांक २१/०७/२०२५ च्या मध्यरात्री व दिनांक २२/०७/२०२५ रोजी झालेल्या मुसळधार/अतिवृष्टीच्या पावसामुळे मौजे तिडी पिंपळगाव ता.सेलू येथील लेंडी नदीच्या लगतच्या दोन्ही बाजुकडील शेतकऱ्यांच्या जमीनी खरडून जावून ०५ ते ०७ फुटाचे खड़े पडले आहेत व जागोजागी वळणे फुटुन जमीन नापीक झाली आहे.तसेच शेतातील सोयाबीन, कापसु, तुर, मुग ही पिके खरडून गेली आहेत व प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच सदर पाण्यामध्ये शेती साहित्य ज्यामध्ये ठिबक, पि.व्ही.सी. पाईप, स्प्रिंकलर, शेती अवजारे इत्यादी वाहून गेले आहे. ज्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशा परीस्थीतीत सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ आधार देण्यासाठी तातडीने सरसगट नुकसान भरपाई देणे अत्यंत गरजेचे असून शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.
मा. सेलू तहसीलदार शिवाजी मगर साहेबांना विनंती करत, मौजे तिडी पिंपळगाव ता. सेलू येथील लेंडी नदीच्या लगतच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रति हेक्टरी ५०,०००/- ने. प्रमाणे तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी असे निवेदनात व्यक्त करण्यात आले..