
दिनांक 23/07/25 सेलू शिवारामध्ये वालूर कडे जाणाऱ्या रोडवर श्री नितीन त्रिंबकराव कुलकर्णी यांच्या शेतातील आखाड्यावर 00.15 दरम्यान तीन अज्ञात इसमाने येऊन तुळशीदास रामभाऊ पडुळे वय 60 वर्ष व द्वारकाबाई तुळशीदास पडुळे वय 55 वर्ष दोघे राहणार निपाणी टाकळी हल्ली मुक्काम कुलकर्णी यांच्या आखाड्यावर. त्यांना रात्री अज्ञात तीन जणांनी तुळशीदास यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी करून त्यांच्याकडील दहा हजार रुपये व महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने असे सात ग्रॅम चा ऐवज जबरीने हिसकावून शेतातून पळून गेले आहे..
सदर जखमी इसमांना परभणी शासकीय दवाखाना सेलू येथे आणल्यानंतर लगेच पुढे परभणी येथे रेफर करण्यात आलेले आहे.

सदर घटनास्थळावर माननीय परभणी जिल्ह्याचे sp रवींद्रसिंह परदेशी साहेब,dysp टिपरसे सर,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पाटील , आणि टीम,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे तसेच सेलू पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार, डॉग , फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक व्हॅन यांनी भेट दिली..

आरोपी शोधकामी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी कामे पथके रवाना करण्यात आली आहे.. या तीन अज्ञात आरोपीचा पोलीस कसोशीने शोध घेत आहोत..
