लोकमान्य टिळकांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने आदरांजली.

सेलू :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू शाखेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त बुधवारी दिनांक 23 जुलै रोजी आदरांजली वाहण्यात आली.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने शहरातील बाबासाहेब रोडवरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ, विलास मोरे, निवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ वाघमारे, सेलू तालुका अध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, सचिव मंजुषा कुलकर्णी, परभणी जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड, सुकाचार्य शिंदे, विनायक जोशी, राजेश कुलकर्णी, गजानन नावडकर, आकाश जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री वाघमारे यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button