दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम

सेलू | प्रतिनिधी सतीश आकात

मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, दि. २४ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू तालुक्यातील कुंडी शिवारात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसाअभावी पिकांवर आलेले संकट, उत्पादनातील संभाव्य घट तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, “कोणीही विचलित होऊ नये. सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी मदत घोषित करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केल्याने प्रशासनाला नुकसानीचे वास्तव समजण्यास मदत होणार असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सेलू तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी तातडीची मदत, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि शासन निर्णयाची प्रतीक्षा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button