जागतिक रेबीज दिनानिमित्त सेलूत मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर.

श्वान व मांजरींचे जंत निर्मूलन, आरोग्य तपासणी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण

सेलू | प्रतिनिधी सतिश आकात

जागतिक रेबीज दिनानिमित्त तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, सेलू यांच्या वतीने सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण, जंत निर्मूलन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेशजी लाहोटी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उदयजी जाधव व तज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. अश्विन भरड उपस्थित होते.

शिबिरात शहरातील श्वान व मांजरींचे जंत निर्मूलन करून आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. उपस्थित श्वानपालकांना त्यांच्या पशुधनाचे आरोग्य कार्ड (हेल्थ कार्ड) वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. दीपक धर्माधिकारी, सहाय्यक आयुक्त, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, सेलू यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी रेबीज आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच पशुपालकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी गटविकास अधिकारी उदयजी जाधव यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. श्वानपालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांचे दरवर्षी नियमित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

तज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. अश्विन भरड यांनी शिबिरातील श्वान व मांजरींची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले व आरोग्य पत्रिकांचे वाटप केले. उपविभागीय अधिकारी शैलेशजी लाहोटी यांनी उपस्थित पशुपालकांना रेबीजच्या संभाव्य धोक्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कुत्र्यांचे नियमित लसीकरण, प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि रेबीजपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. दीपक धर्माधिकारी यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तरा यंगडे, संगीता दादेवार, मारुती खंदारे, विकास राठोड, सुभाष दशरथे, गोविंद काकडे, आप्पासाहेब माने, लक्ष्मण खंडागळे, सीमा नालमे, केदारजी गजमल, स्वच्छता निरीक्षक काकडे साहेब (नगरपरिषद सेलू) व अभिषेक राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे पशुपालकांमध्ये रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून शिबिराबाबत परिसरातील पशुपालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button