सेलूत ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव..

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था आयोजित कर्तृत्ववानांचा सन्मान सोहळा

सेलू (प्रतिनिधी) : स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था, सेलू यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा’ वर्ष ५ वे हा भव्य सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री साई नाट्यगृह, सेलू (जि. परभणी) येथे होणार आहे.

कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी करूणा दीदी (सेवा केंद्र, भोसरी, पुणे) लाभणार असून अध्यक्षस्थानी ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये मा.भावना ताई मुंगसे-बोर्डीकर,आर.बी.घोडके,विजयमाला डोंबे, डॉ. संजय रोडगे,मिलिंद सावंत,दिनकर वाघ,गणेश काटकर,अशोक शेलार,संजय साडेगावकर,अजय डासाळकर,योगिताताई मोरे,डॉ.आशिष डख,रामेश्वर राठोड, डॉ.सुनील कुलकर्णी,प्रा.के. डी. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सन्मान कर्तृत्वाचा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अध्यात्म, शेती, वैद्यकीय, पत्रकारिता, साहित्य, नाट्य व कला, शिक्षण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यामध्ये ह.भ.प. पंडित महाराज डाके, सौ. अरुणा भुजंग थोरे, ह.भ.प. रमेश महाराज मोरे,डॉ. दिगंबर घोडके, मा.दिलीप डासाळकर, डॉ. सुरेश हिवाळे, प्रा.अनिल कुलकर्णी, माधव गव्हाणे, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी, गणेश माळवे आदींचा समावेश आहे.

तसेच विशेष सन्मान म्हणून आदरणीय सौ. मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांचा मातृ गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे विनंतीकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button