सेलूत गुटखा साठ्यावर कारवाई; मात्र खुलेआम विक्रीवर प्रश्नचिन्ह कायम?

सेलू : शहरातील अजंटा कॉलनी परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५९,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली असून, या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे विष्णू असाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख राजू शेख इब्राहीम (रा. अजंटा कॉलनी, सेलू) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आरोपीने आपल्या राहत्या घरात व किराणा दुकानात आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा करून ठेवला होता. पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पसार झाला.या कारवाईत केसरयुक्त विमल पानमसाला, V-1 तंबाखू, प्रिमियम राजनिवास पानमसाला व के.एम. जाफरानी जर्दा असे विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. परभणी गुन्हा शाखा व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button