“सेवा हीच साधना… भाविकांच्या आरोग्यासाठी नरसिंह आयुर्वेदचा अनोखा उपक्रम”

सेलू : भक्ती, सेवा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत असलेला ज्ञानेश्वर फिरता पारायण सांगता सोहळा सध्या सेलू शहरात भक्तिभावात रंगला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडणाऱ्या या अद्भुत आणि पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची प्रामाणिक भावना मनात ठेवून नरसिंह आयुर्वेदतर्फे एक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्यासाठी दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा हीच ईश्वरसेवा मानत डॉ. मंथन लोकूलवार आणि त्यांच्या टीमने मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत चारशेहून अधिक रुग्णांनी तपासणी करून उपचारांचा लाभ घेतला आहे.
या शिबिरामध्ये आयुर्वेदातील विद्धकर्म व अग्निकर्म या प्रभावी उपचार पद्धतींच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. वाताचे विकार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, डोकेदुखी, पोटाचे आजार, मुतखडा यांसारख्या त्रासांवर उपचार करून भाविकांना दिलासा देण्यात येत आहे.
भक्तीच्या या महासागरात आरोग्यसेवेची ही छोटीशी पण मोलाची सेवा भाविकांसाठी आशीर्वाद ठरत आहे. “सेवा हीच खरी साधना” या भावनेतून उभा राहिलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button