
दि. ६ व ७ मार्च २०२६ रोजी Yashwantrao Chavan Arts, Commerce and Science College, Lakhandur येथे “Frontiers in Life Sciences and Material Science at the AI–IPR Interface” या अत्यंत समकालीन व संशोधनाभिमुख विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये देशभरातील विविध महाविद्यालये व संशोधन संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या परिषदेत नूतन महाविद्यालय, सेलू (जि. परभणी) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Zoom) माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला. या परिषदेमध्ये B.Sc. प्रथम वर्ष (सूक्ष्मजीवशास्त्र) येथील विद्यार्थिनी कु. अक्षदा चंद्रकांत हेलसकर हिने Oral Presentation (ऑनलाईन डेमो) सादर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सादरीकरण कौशल्य प्रभावीपणे प्रदर्शित केले. तिच्या उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाची दखल घेत तिला तृतीय क्रमांक (Consolation Prize) प्रदान करण्यात आला. विद्यार्थिनीच्या या उल्लेखनीय यशामुळे नूतन महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा गौरव वाढला असून हा विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल तिचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड व उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.अर्चना पत्की मॅडम, विभागप्रमुख डॉ.पी. आर. कंठाळे तसेच डॉ. अमित कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थिनीचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी सहभागामुळे सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली असून विभागाची शैक्षणिक व संशोधनात्मक परंपरा अधिक बळकट होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व्यासपीठावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे हा सहभाग सूक्ष्मजीवशास्त्र विभागासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला आहे.