विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर….

येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने कुपटा सर्कलमधील उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र काका लहाने – रवळगाव, राम नाना खराबे – वालूर, नामदेव उर्फ अप्पासाहेब डख – देऊळगाव (गात), पुरुषोत्तम पावडे – चिकलठाण तसेच प्रकाश मुळे यांना कुपटा सर्कलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
या उमेदवारांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात मजबूत संघटन उभे केले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उमेदवारी जाहीर होताच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचाराची तयारी वेगाने सुरू करण्यात आली आहे. माजी आमदार विजयराव भांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आगामी निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button