सलग १९व्या वर्षी MDRT बहुमान; सेलूचे भारत डख यांची दैदीप्यमान कामगिरी…

सेलू | प्रतिनिधी

मागील अठरा वर्षांपासून सातत्याने MDRT (Million Dollar Round Table) हा मानांकन दर्जा कायम राखणारे आपल्या शाखेचे ज्येष्ठ विमा सल्लागार श्री. भारत डख यांनी याही वर्षी MDRT चे उद्दिष्ट पूर्ण करत सलग १९वा MDRT बहुमान पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे शाखास्तरावर संतोष कोडगिरकर (सिनिअर ब्रांच मॅनेजर) उपेंद्र बेलूरकर (सीनियर ब्रांच मॅनेजर) किरण गुंडेकर (डेव्हलपमेंट ऑफिसर) व LIC ऑफिस स्टाफ आणि मित्र यांच्यातर्फे सत्कार व कौतुकास्पद स्वागत व सत्कार करण्यात आला.

विशेष बाब म्हणजे, यावर्षी संपूर्ण नांदेड विभागातून केवळ दहा विमा सल्लागारांनाच हा प्रतिष्ठेचा बहुमान मिळाला असून, सेलू शहरातून एकमेव पात्र विमा सल्लागार म्हणून श्री. भारत डख यांनी हा सन्मान मिळवला आहे. ही बाब सेलूसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

ग्राहक विश्वास, सातत्य, प्रामाणिक सेवा व कठोर परिश्रम यांच्या जोरावर श्री. भारत डख यांनी हे यश संपादन केले असून, त्यांची ही कामगिरी नवोदित विमा सल्लागारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button