
सेलू, दि. 28 डिसेंबर 2025 —
स्व. एकनाथ ठोंबरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त KDS Classes, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम कॉम्प्लेक्स, सेलू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात एकूण 30 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये 9 महिला व 21 पुरुष रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून स्व. एकनाथ ठोंबरे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
शिबिराचे आयोजन अविनाश कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जागृती निर्माण होण्यास मदत झाली असून गरजू रुग्णांसाठी हा रक्तसाठा उपयुक्त ठरणार आहे. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
