
सेलू,दि. 24
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ड झोन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाले.उद्घाटक म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक पवन आडळकर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी खेळाकडे केवळ खेळ म्हणून न पाहता करिअरचे माध्यम म्हणून पहिल्यास निश्चितच या क्षेत्रात मोठे भवितव्य असल्याचे प्रतिपादन पवन आडळकर यांनी केले.
अध्यक्षीय समरोपात प्राचार्य डाॅ.उत्तम राठोड यांनी विद्यापीठ व नूतन महाविद्यालय खेळाडूंसाठी विविध सुविधा पूरवत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच कुठल्या ना कुठल्या खेळावर आपले प्रभुत्व मिळवण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. खेळातून आरोग्याबरोबरच आपले करीअरही घडू शकते. त्यामुळे अशा स्पर्धांचे नियमित आयोजन महाविद्यालयात केले जाते.
या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक साईराज बोराडे, राज्य सचिव टेनिस व्हॉलीबॉल गणेश माळवे, पोलीस अधिकारी माधव गोरे, मिनानाथ गोमचाळे, प्रा.संतोष कोकीळ, प्रा. मदनसिंग ठाकुर, प्रा. सतिश बरकुडे प्रा. राजेश राठोड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक डाॅ.कमलाकर कदम यांनी केले. डॉ.राजाराम झोडगे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्रा.मोहन पाटील यांनी केले. ड झोन क्रिकेट स्पर्धेत हिंगोली, परभणी जिल्ह्यातील सहा महाविद्यालय संघांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सत्यम बरकुले, प्रा.अविनाश सुञावे, प्रा ,प्रा विजय पठारे,डाॅ. कुमठेकर, प्रा.आर.एन.कदम, रिठ्ठे दत्तात्रय, रवी शिंदे, हालगे प्रविण, सखाराम बरसाले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
स्वा. रा. ती. म विद्यापीठ, नांदेड व नूतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड’ झोन आंतर महाविद्यालयीन क्रिकेट (मुले)स्पर्धा नूतन महाविद्यालय च्या मैदानावर आयोजित केल्या.त्या प्रसंगी अंतिम सामना शिवाजी महाविद्यालय परभणी विरुद्ध नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडाबाळापूर
यामध्ये झाला . यामध्ये विजेता संघ नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडाबाळापूर तर शिवाजी महाविद्यालय परभणी उपविजेता ठरला.
पंच म्हणून काम पाहिले राजेश राठोड,प्रवीण चाळक ,झीशन सिद्धीकी ,सलमान सिद्दिकी,प्रमोद गायकवाड, बालाजी बोराडे, सत्यम बरकुले कपिल ठाकूर सुरज शिंदे