
नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित सौ. सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सत्यनारायणजी लोया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मकरंदजी दिग्रसकर, दत्तरावजी पावडे, राजेशजी गुप्ता उपस्थित होते. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे, ज्येष्ठ शिक्षक एकनाथ जाधव यांचीही उपस्थिती लाभली.
स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून संजयजी विटेकर व प्रमोद देशमुख यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक उल्हास पांडे सर यांनी “खरा तो एकची धर्म” या प्रार्थना गीताने केली.
ही स्पर्धा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली असून तालुक्यातील विविध शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत साने गुरुजींच्या विचारांचा जागर केला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
🔹 प्रथम क्रमांक – कु. अवंतिका अक्षय जोशी (श्री. के. बा. विद्यालय, सेलू) – ₹1001 रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह
🔹 द्वितीय क्रमांक – कु. सोळंके शरयू लक्ष्मण (नूतन प्राथमिक शाळा, सेलू) – ₹751 रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह
🔹 तृतीय क्रमांक – कु. मनस्वी मंगेश महाजन (पोद्दार लर्न स्कूल) – ₹501 रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह
🔸 उत्तेजनार्थ पारितोषिके
- चि. फटाले श्लोक लक्ष्मीकांत (बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू) – ₹201 व स्मृतिचिन्ह
- कु. प्रेक्षा बाबुराव साबणे (शांताबाई नखाते प्राथमिक आश्रम शाळा, वालूर) – ₹201 व स्मृतिचिन्ह
सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली कुबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे, ज्येष्ठ शिक्षक एकनाथ जाधव, सावरगावकर, पानझाडे, महामुनी, गोरे, खाटीकमारे, हळणे, डुकरे, चौधरी मॅडम, डोळस मॅडम, कुंभार मॅडम, गजमल मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि श्री. पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.