सेलू नगरपालिकेचा ‘निकाल वेटिंग’ थरार; चौकाचौकात अंदाजांचे फटाके, उमेदवारांची धडधड वाढली!

सेलू | प्रतिनिधी:-सतिश आकात

02 डिसेंबर रोजी पार पडलेल्या सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल अखेर २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, अवघे काही दिवस शिल्लक असताना संपूर्ण शहराचे लक्ष आता निकालाच्या काऊंटडाऊनकडे लागले आहे.
सुरुवातीला 03 डिसेंबरला अपेक्षित असलेला निकाल पुढे ढकलण्यात आल्याने, मतदारांची उत्सुकता तर शिगेला पोहोचलीच आहे, पण त्याचसोबत अंदाज, टोमणे आणि राजकीय चर्चांचा बाजार चांगलाच तापला आहे.

आज सेलू शहरातील प्रत्येक चौक, चहाची टपरी, पानपट्टी आणि गल्लीबोळात एकच चर्चा रंगताना दिसत आहे —
यावेळी कोण घेणार विजयाचा गुलाल?”
“कोणाचा चेहरा पडणार?”
“कुठे फुटणार राजकीय फटाके?”

यावेळी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी लावलेल्या जोरदार मुसंडीमुळे पारंपरिक पक्षांची गणितं बिघडल्याची चर्चा आहे.
“यावेळी अपक्ष किती?”
“कोणत्या प्रभागात पक्षांना धक्का?”
“सत्तेची चावी कोणाच्या हातात?”
असे प्रश्न आता केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, राजकीय टोमणेबाजीचा विषय ठरत आहेत.

एका चौकात म्हणतात, “यावेळी निकाल पाहूनच काही नेते विचारात पडणार!”
तर दुसरीकडे, “अपक्षांनी कौल फिरवला तर गणित बदलायला वेळ लागणार नाही!” अशा चिमट्याही रंगत आहेत.

उत्सुकता, तणाव आणि शांत वादळ…

निकालाची तारीख लांबल्याने उमेदवारांमध्ये आतून तणाव, बाहेरून आत्मविश्वास आणि आतल्या आत हिशेब सुरू असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
२१ डिसेंबर रोजी विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर उडणार आणि कोणाच्या राजकीय स्वप्नांवर पाणी पडणार, हे पाहण्यासाठी सेलू शहर अक्षरशः श्वास रोखून बसले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button