सेलू तालुक्यातील हातनूर,साळेगावातही बिबट्याचे दर्शन..

हातनूर येथे गायीवर हल्ला ◾वनविभागकडून सतर्कता बाळगण्याचे अवाहन
◾फेक व्हिडिओ बनविणा-यांवर गून्हे नोंदविणार

सेलू:तालूक्यातील अनेक गावातील शिवारात बिबट्या चा वावर असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने शेतक-यात बिबट्याची भिती कायम आहे तर सोमवार १५ रोजीच्या सकाळी ५ वाजता हातनूर शिवारातील सोनाजी डूकरे यांच्या गट क्रमांक १०९ येथील शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली मात्र बाजूला शेतात असलेल्या शेतक-यांनी आरडाओरड केल्याने तेथून बिबट्या पळून गेला.तर सकाळी ११:३० वाजेच्या सूमारास साळेगाव येथील रामेश्वर गायके यांच्या गट क्रमांक १०९ मध्ये बिबट्या आढळून आल्याचा दूजोरा मिळाला आहे.हातनूर येथील डूकरे यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से वनविभागाच्या अधिका-यांनी घेतले असून बिबट्याच असल्याचा दूजोरा त्यांनी दिला असल्याने शेतकरी शेतात राहण्यास घाबरत असून सध्या शेतात पिकांना पाणी देणे आदी कामे सूरू असल्याने नाईलाजास्तव शेतक-यांना शेती कामे करावी लागत आहेत.दरम्यान वनविभागाच्यावतिने रात्रीच्यावेळी शेतक-यांना शेतात जाणे टाळावे तसेच जायचे असेल तर गटानूसार जावे अशी खबरदारी व शेतातील पशूधन उघड्यावर बांधण्यात येवू नये शक्यतो पशूधन घरी घेवून यावे अशी सतर्कता बागळगण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

◾फेक व्हिडीओ व फोटो प्रकरणी गून्हे नोंदवणार
सेलू तालूक्यात बिबट्याचा वावर असल्याची पाऊलखूणावरून तसेच पशूधनावर होत असलेले हल्ले यावरून शक्यता नाकारता येत नाही.नागरीकांनी बिबट्याचा वावर आहे हे समजूनच शेतातील कामे करावीत जेणे करून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करता येईल मात्र काही लोक फेक व्हिडिओ व फोटो बनवून समाजमाध्यावर व्हायरल करत आहेत.अशी फेक व्हिडिओची घटना धनेगाव,कूंडी येथे घडली त्यांच्यावर गून्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल तसेच सेलू शहरात बिबट्या असल्याचा फेक व्हिडिओ बनविण्यात आला असून तो खोटा व्हिडिओ आहे संबधित व्हिडिओ टाकणाराचा शोध घेण्यात येत असून त्यावर सूद्धा गून्हा दाखल करण्यात येणार आहे.असे फेक खोटे व्हिडिओ बनवून समाजमाध्यावर व्हायरल होत असल्याने नागरीक भयभित झाले आसल्याची प्रतिक्रिया वनपाल अंकूश जाधव यांनी दैनिक देशोन्नती शी दिली आहे.

सेलू:तालूक्यातील हातनूर व साळेगाव शेत शिवारात बिबट्याने गायीवर हल्ला केला त्यांची पाहणी करण्यासाठी आलेले वनपाल अंकूश जाधव,पोलीस पाटील रामचंद्र पारवे,राजेश राऊत,रामेश्वर गायके,सोनाजी डूकरे सह आदी.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button