नायलॉन मांजा वापर कायद्याने गुन्हा – सेलू पोलीसांचा इशारा

सेलू शहर व परिसरात नायलॉन मांजा वापरणे हे कायद्याने गुन्हा असल्याचे सेलू पोलीसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत होण्याचे तसेच अपघात घडून एखाद्याचा जीव जाण्याचीही शक्यता असते.विशेषतः प्रवासी नागरिक, दुचाकीस्वार तसेच निरपराध पक्ष्यांच्या जीविताला नायलॉन मांजा अत्यंत घातक ठरत आहे. यामुळे मान, हात, चेहरा यांना खोल जखमा होण्याच्या घटना घडत असून रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करणारे तसेच वापरणारे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सेलू पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून नायलॉन मांजा वापरणे व विक्री करणे टाळावे, असे आवाहनही पोलीसांनी केले आहे.सार्वजनिक सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही सेलू पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button