सेलूत गुंजला वंदे मातरम गीताचा जयघोष.

महर्षि वाल्मिकी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम.

सेलू : नुतन विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी “वंदे मातरम” गीताचा जयघोष गुंजला. महर्षि वाल्मिकी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेलू व नुतन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी नुतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रमोद कराड उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये नायब तहसीलदार विजय मोरे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर दहिफळे, गटविकास अधिकारी उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, लोकमत पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर, आय.टी.आय.चे गटनिदेशक बी.डी. वळसे,मुख्याध्यापक सतोष पाटील, पांडे, समिती सदस्या रमाताई शेजावळे, शितल सोळंके, जनार्धन कदम, आरुण राऊत, अमोल निकम यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे आणि पूजा तोडकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी लयबद्ध सादरीकरणात वंदे मातरम गीत सामूहिकरीत्या गायले.


या प्रसंगी ‘वंदे मातरम् गीत राष्ट्र उभारणीचे स्फुरण’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देताना वक्ते प्रमोद कराड म्हणाले की, “‘वंदे मातरम्’ हे गीत केवळ राष्ट्रगीताचा भाग नसून, स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणास्रोत आहे. या गीताने देशभक्तांना देशसेवेची व बलिदानाची प्रेरणा दिली असून आजही त्याचे शब्द प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवतात. विद्यार्थ्यांनी या गीतामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊन ती आचरणात आणावी.”
यावेळी शिक्षक डॉ. सुरेश हिवाळे आणि शिल्पा बरडे दिग्दर्शित ‘वंदे मातरम’ या नाटिकेने उपस्थितांना भावनिक केले. या नाटिकेत शाळेतील सान्वी हेलसकर, मृण्मयी इक्कर, शब्दा लाटकर, श्रीराम खिस्ते, मोक्षदा कडगे, उत्तरा लोंढे, समृद्धी डमरे, श्रेया उपासे, राजवीर खेडेकर आणि श्रेयस लिंगायत या बालकलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या.
मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड व संध्या फुलपगार यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिल्पनिदेशक पवन जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय.टी.आय.चे प्रभारी गटनिदेशक बी.डी. वळसे, शिल्पनिदेशक काचगुंडे, कासार, पवन जोशी, सातारकर, गादेवाड, कांबळे आणि सोनकांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button