रामबाग मित्र मंडळाला तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक..

सेलू : प्रतिनिधी सतिश आकात

मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ परिश्रमामुळे रामबाग मित्र मंडळ, सेलू (बालाजी मंदिर ट्रस्ट अंतर्गत) यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मध्ये तालुकास्तरीय विजेता ठरले आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर आयोजित केली जाते. राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा तिन्ही स्तरांवर हजारो मंडळांमध्ये स्पर्धा होत असून, त्यात रामबाग मंडळाने मिळवलेले यश हे शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

शासन निर्णयानुसार, तालुकास्तरीय विजेत्या मंडळांना ₹२५,०००/- चे पारितोषिक व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान म्हणजे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या व सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या उपक्रमांचा गौरव आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित स्पर्धेत राज्यस्तरीय ३, जिल्हास्तरीय ९२ व तालुकास्तरीय ४४ असे एकूण १३९ मंडळे विजेते ठरली आहेत. त्यामध्ये सेलू शहराचा सांस्कृतिक वारसा रामबाग मित्र मंडळाच्या वतीने उचलण्यात आला.

🏆 महाराष्ट्रभरात घेण्यात आलेली पारितोषिके

राज्यस्तरीय : प्रथम ₹७.५० लाख, द्वितीय ₹५ लाख, तृतीय ₹२.५० लाख,

जिल्हास्तरीय : ₹५०,००० / ₹४०,००० / ₹३०,०००

तालुकास्तरीय : प्रत्येकी ₹२५,००० अशी ठेवण्यात आली होती.

या यशामागे बालाजी मंदिर ट्रस्टचे मार्गदर्शन, शहरातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग व शुभचिंतकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असल्याचे मंडळाने सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button