
स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त सोहळा साजरा

ऐतिहासिक घडी टाॅवर वरिल घड्याळ सुरू न झाल्यास उपोषण करणार …..सुनील गायकवाड
मायभुमीच्या मुक्तीसाठी रक्त सांडिले ज्यांनी युगायुगातुन ठरेल प्रेरक त्यांची अमर कहानी
दि 17 सप्टेंबर बुधवार रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारक ऐतिहासिक घडी टाॅवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नायक) यांच्या अर्धा कृती पुतळ्यास नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
तसेच डाॅ. अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , कुलस्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त सन्मान माजी सैनिकांचा 2025 आयोजन साईबाबा मंदिर सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा अधिकारी शैलेश लाहोटी,
तहसीलदार डाॅ शिवाजीराव मगर पोलीस निरीक्षक दिपक बोरसे ,मुख्याधिकारी तुकाराम कदम,डाॅ अनुराग जोगदंड, सेवानिवृत्त अभियंता विलासराव पाटील,सेवानिवृत्त प्रा.के.डी वाघमारे,कॅप्टन जे.पी.शर्मा ,सेवानिवृत्त बॅंक अधिकारी पांडुरंग ढवळे,पत्रकार संघ अध्यक्ष लक्ष्मणराव बागल,अँड रामेश्वर शेवाळे, बॅक अधिकारी रामराव लाडाणे, महिला मंडळ सचिव ललीता गिल्डा, सुनील गायकवाड, विक्रांत पाटील, मधुकर पौळ,आदि मान्यवर उपस्थित होते .
मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून व पुंजाराम निर्वळ यांनी जय जवान जय किसान म्हनत माजी सैनिक व शेतकरी यांचे पाय धुऊन सत्कार केला व कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रास्ताविक आयोजक सुनील गायकवाड ते म्हणाले की सेलूतील जेष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गेना यांचा सन्मान सोहळा हा आमच्यापिठीला प्रेरणादायी असून हा कार्यक्रम माझा एकट्याचा नसुन शहरातील दानशूर मित्रपरिवार व सहकार्यांचा आहे तसेच नगर परिषद प्रशासनाने बंद पडलेल्या घडी दुरुस्त करून द्याव्यात अन्यथा मी व माझे सहकारी उपोषण करणार.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून के.डी वाघमारे यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप विलासराव पाटील यांनी केले.
सत्काराला उत्तर माजी सैनिक रमेशराव काकडे यांनी दिले.
सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केल तर आभार प्रदर्शन विक्रांत पाटील यांनी माणले
कार्यक्रमाच्या यश्वतेसाठी, आयोजक विक्रांत पाटील, डाॅ अनिकेत जोगदंड, सुनील गायकवाड,पुजाराम निर्वळ,रामप्रसाद बोराडे, शुकाचार्य शिंदे,नागोराव देशमुख कृष्णा शेरे, किशोर भांडवले,सतिश जाधव,
सतिश आकात, सुशिल तोगरे ,प्रशांत ठाकूर, भगवान पावडे, काशिनाथ पल्लेवाड,मंजुषा कुळकर्णी,निर्मला लिपणे दासुपंत पितळे,चंद्रकांत गटकळ, शेख रसुल, आदिनी परिश्रम घेतले.
