सेलू परिसरात भरधाव दुचाकीची 62 वर्षीय वृद्धस धडक.

सेलू (ता. सेलू, जि. परभणी) – रायगड कॉर्नर येथे भरधाव दुचाकीची धडक बसून एका वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख सुजायत शेख खाजा (वय 24, रा. राजमोहला, सेलू) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे वडील खाजा चाँद शेख (वय 62) हे 10 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता नातेवाईकांना भेटण्यासाठी परतुरकडे जाण्यासाठी रायगड कॉर्नर परिसरात पायी गेले होते. त्या वेळी ते फळगाड्यासमोर उभे असताना रेल्वे स्टेशन सेलूवरून रायगड कॉर्नरकडे भरधाव वेगात येणाऱ्या होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MH-22-BF-4704) चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ने जोराची धडक दिली.

या अपघातात खाजा चाँद शेख यांना डाव्या पायाच्या घोट्याजवळ गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाला आहे.

या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात कलम 281, 125(b) भा. दं. सं. 2023 अन्वये पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शेख उस्मान यांच्याकडे देण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button