सेलू विभागातील गणेश विसर्जन उत्सव शांतता पूर्ण संपन्न.

सेलू विभागातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत संपन्न झाली. मिरवणुकीसाठी पोलिसांचा फौज फाटा व महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस पथक साध्या वेशातील पोलिसांची ग्रस्त सीसीटीव्ही वाच टावर द्वारे पोलिसांनी लक्ष वेधले होते.परभणी चे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार सेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी या मिरवणुकी मध्य बंदोबस्ताचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले यावेळी लेझर लाइट्स किंवा घातक दिव्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता.डीजे मुक्त गणेश विसर्जन नवीन रुजू झालेले उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जना अगोदर सेलु, पाथ्री, मानवत ते विभागामध्ये रूट मार्च काढण्यात आला.दंगा नियंत्रण परीक्षा नाही पूर्ण करण्यात आली होती. तसेच राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) या बंदोबस्तात सहभागी होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button