सेलू येथे गणेश विसर्जनाच्या मुख्य मार्गाची अधिकाऱ्यांमार्फत पाहणी.

दि.4/09/2025 रोजी सकाळी 11:30 विजेच्या सुमारास सेलू शहरातील गणेश विसर्जनाच्या मुख्यमार्गाची पाहणी करण्यात आली.

सदर पाहणीच्या वेळी  उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू श्री दिपककुमार वाघमारे, मुख्याधिकारी, नगरपरिषद सेलू श्री कदम व त्यांची टीम, सेलूचे नायब तहसीलदार श्री विजयकुमार मोरे  व त्यांची टीम, पोलीस निरीक्षक श्री दीपक बोरसे  महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते 

श्री गणेशाचे विसर्जन बाजार समिती आवार सेलू येथील सार्वजनिक विहिरीत करण्यात येणार असून,त्या दृष्टीने नगरपालिकेने बॅरिकेटिंग,सीसीटीव्ही तसेच पोहणाऱ्या लोकांची व्यवस्था केलेली करण्यातआलीआहे. विसर्जनाच्या वेळी आरती झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ठेवलेल्या लोकांच्या ताब्यात देण्याचीव्यवस्थाकरण्यातआली.त्यानंतर त्यांच्यामार्फत विसर्जन केले जाणार आहे…
सेलू शहरातील घरगुती गणपती जमा करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी स्टॉलची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button