
मुक्तांगण आर्ट्सचा उपक्रम
सेलू येथील 'मुक्तांगण'च्यावतीने कलार्थ्यांची ग्रेड परीक्षेतील भीती दूर व्हावी व त्यांना चांगला ग्रेड मिळावा आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता. 8 व 9 सप्टेंबर.) रोजी करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील,उपमुख्याध्यापक पी. जी.कपाटे.,पर्यवेक्षक दत्ताराव घोगरे, उपक्रमशील शिक्षिका कीर्ती राऊत,कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते.
कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी प्रथम दिवशी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा विषय , वस्तू चित्र, स्मरण चित्र,संकल्प चित्र व नक्षीकाम आणि अक्षरलेखन आदी विषयी सोप्या भाषेत व डेमो द्वारे मार्गदर्शन केले . या बरोबरच कागदकाम ललित कला विषयी माहिती , टाळ्यांचे प्रकार या विषयी मार्गदर्शन केले.
द्वितीय दिवशी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा प्रविष्ट विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले… या वेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी 59 कलार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती कीर्ती राऊत यांनी केले तर आभार श्रीमती माधुरी कुंभार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र गांजापूरकर, सुजाता रासवे, यांचे सहकार्य लाभले.
