
सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आलीआकस्मिक मृत्यूची नोंद.
सेलू तालुक्यातील सोन्ना येथे एका २५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी पत्राच्या लोखंडी अडूला कापडाच्या दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना गुरुवार २१ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजता उघडकीस आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील सोन्ना येथील पवन सुभाष मगर वय २५ वर्षे या तरुणांने राहत्या घरी गुरुवार २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता राहत्या घरी दारूच्या नशेत कापडाच्या दोरीने पत्राच्या लोखंडी अडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार गुलाब राठोड, पोलीस हवालदार मुकेश बुधवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वालूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तोरकड यांनी शवविछेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाचे वडील सुभाष विश्वनाथ मगर राहणार सोन्ना यांनी दिलेल्या खबरे वरून २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत.शुक्रवार २२ऑगस्ट रोजी दुपारी मूळ गावी सोन्ना येथे मयत पवन मगर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आजी, आजोबा ,आई,वडील ,दोन चुलते असा परिवार आहे. या घटनेमुळे सोन्ना सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.