
दिनांक 21 जुलै 2025 रोजी सेलू येथील तहसील कार्यालय समोर गायरानधारकांच्या प्रश्नावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. भीमशक्ती मानवी हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन करण्यात आले की,येत्या 40 ते 50 वर्षापासून दलित आदिवासी व गायरान धारक हे अतिक्रमण करून गायरान जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने अनेक परिपत्रक निघून सुद्धा जिल्हा प्रशासन गायरान धारकाच्या बाजूनी कधीच परिपत्रकानुसार कारवाही केली नाही. त्यामुळे अनेक गायरान धारक सातबारा मालकी हक्क मिळवण्यापासून वंचित राहिले आहे. वारंवार आपल्या कार्यालयास गायरानाचे पुरावे सादर केलेले असून अद्यापिक कार्यवाही झालेली नाही.

म्हणून दिनांक 21 जुलै 2025 रोजी
1) शासनाच्या 2010 11 निघालेल्या परिपत्रकानुसार गायरान धारकांनी पीक पेरा व एक ई ला नोंद घेण्यात यावी
2) गायरान धारक कास्तकार स्त्री-पुरुष 1990 च्या परिपत्रकानुसार सातबारा मालकी हक्क देण्यात यावा
3) विधानसभेमध्ये नव्याने पारित झालेला जन सुरक्षा विधायक हा कायदा रद्द करण्यात यावा
4)सेलू तालुक्यातील ज्या ठिकाणी दलित वस्तीला स्मशानभूमीला जागा नसेल तेथे जागा उपलब्ध करून देण्यात यावे
5) मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ज्या ठिकाणी कष्ट असलेल्या गायरानधारकांच्या गायरान उभारण्यात येत असलेल्या तो तात्काळ थांबवण्यात यावा
या प्रमुख मागण्या या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये भीमशक्ती मानवी हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने मागण्यात आल्या होत्या.