बाप कंपनी आयोजित करियर गायडन्स सेमिनार साठी विद्यार्थी आणि पालकांचा भरघोस प्रतिसाद..

दिनांक ८ जुलै २०२५ रोजी जिंतूर येथील माउली मंगल कार्यालयात बाप या आय टी कंपनीने aविद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार आयोजित केला होता.या प्रसंगी बाप या आय टी कंपनीचे संस्थापक श्री रावसाहेब घुगे आणि ग्लोबर्क सोलुशन चे संस्थापक श्री ध्रुव जी साकोरे यांचे प्रमुख मार्गदर्शन मुलांना मिळाले. १२ वि नंतर करिअर संबंधात मुलांमध्ये खूप सारे संभ्रम निर्माण होतात.अशावेळी मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणे फार गरजेचे असते.आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बाप कंपनीने या चर्चासत्राचे आयोजन केले होते.या चर्चासत्रासाठी जिंतूर तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गाने हजेरी लावली. या मुलाखतीसाठी पत्रकार संघ सेलू च्या डिजिटल मीडिया चे हेड

श्री.सतिश आकात सर मुलाखतकार म्हणून लाभले . या प्रसंगी बोलताना बाप कंपनीचे संस्थापक श्री रावसाहेबजी घुगे यांनी AI क्षेत्रातील करिअर च्या संधी, AI बद्दल असणारे गैरसमज तसेच तंत्रशिक्षणाचा शेतीमधील वापर यासंबंधी उपस्थितांना जागरूक केले. आपण घेत असलेले शिक्षण केवळ रोजी रोटी पुरते मर्यादित न राहता सामाजिक दृष्टीने ते कसे फायद्याचे ठरू शकेल या पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते घ्यायला हवे. याचेच उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या गाव गोठा या संकल्पनेबद्दल माहिती दिली. कमी पाण्यात कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांना शिक्षित करून त्यांना शेती सुजाण आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनविण्याचे काम गाव गोठा हि संकल्पना करत आहे, त्यामध्ये इस्राईल शेती,तसेच लॉजिस्टिक सेवा म्हणजेच शेतकऱ्याने पिकवलेला माल तो स्वतः कसा विकू शकतो याबद्दल देखील माहिती दिली, म्हणजेच टेक्नोलोंजि शिकणारी हि मुले हि टेकनॉलॉजि आपल्याच शेतीला पूरक बनवू शकतात.


या वेळी ग्लोबर्क सोलुशन चे संस्थापक श्री ध्रुव जी साकोरे देखील उपस्थित होते, कार्बन क्रेडिट या फारश्या माहित नसलेल्या विषयाबद्दल त्यांनी भाष्य केले. आपण शेतीतून अशा पद्धतीतून पण उत्पन्न घेऊ शकतो याची माहिती त्यांनी दिली, त्याचबरोबर द बाप कंपनीने परभणी जिल्ह्यात आणलेल्या आय टी मधील संधी याबाबत देखील विश्वास व्यक्त केला, बाप हि कंपनी परभणीच्या आय टी क्षेत्रातील नांदी ठरेल असे ते म्हणाले .
या प्रसंगी डॉ.दुर्गादास कानडकर, श्री अनंत अलने यांनी software developer बनण्यासाठी येणारी आव्हाने आणि श्री खंडेराव भिसे सर यांनी सध्याची शिक्षण पद्धती आणि त्यात हव्या असलेल्या सुधारणा यावर आपले मनोगत व्यक्त केले .


कार्यक्रमाच्या शेवटी श्री ध्रुव भैय्या साकोरे , जिंतूर फार्मसी कॉलेज चे प्राचार्य श्री कुकडे सर , श्री सतीश आखात सर , बोर्डीकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास मुटकुळे सर यांचे सत्कार करण्यात आले .
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबत श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयाचे प्राचार्य शेती सुभाष कदम सर , पत्रकार संघाचे प्रतिनिधी श्री महेश देशमुख सर,श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर BCA महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णाताई मुंढे मॅडम , श्री खंडेराव भिसे सर व श्री एस बी खिस्ते सर यांचा सत्कार करण्यात आला .


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज करंजे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी द बाप कंपनीचे COO श्री भाऊसाहेब जी घुगे, डिजिटल मीडिया मॅनेजर श्री अभय जी रोहोम तसेच श्रेयस जी गायकवाड , अनिकेत जी कुटे,श्री प्रेम जी वानखडे , श्री उदयराज जी सोने , श्री पांडुरंग जी जाधवर,श्री अर्सलान जी खान,आदित्य जी सातपूते आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button