रस्त्याच्या मध्यभागी बांधकाम कच टाकल्याने झाली नागरिकांची दैना..!

सेलू शहरातील बाबासाहेब मंदिर ते नूतन महाविद्यालय रोड हा चांगल्या रहदारीचा असून वरील पडूळे मेडिकलच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी फुटपाथ च्या कामासाठी बांधकाम कच टाकल्याने वाहतुकीसाठी नागरिकांची चांगलीच दैना होत आहे. बांधकामाच्या नावाने गुत्तेदाराचा मनमर्जी-मनमानी कारभारा नुसार कुठल्याही प्रकारचा सूचनाफलक न लावता रस्त्याच्या, मध्यभागी बांधकामाचे साहित्य टाकून नागरिकांची परवा न करता हुकूमशाही पद्धतीने लोकांना त्रास होईल की नाही याची काळजी न घेता बांधकाम उपयोगीकच वस्तू सेलू शहरात टाकण्यात येत आहे.

यामुळे अनेक गाड्या घसरण होत आहेत आणि वयोवृद्ध लोकांची चांगलीच फजिती पाहायला मिळत आहे. सदरील गोष्टीवर नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून शहरात ठीक ठिकाणी रोडवर बांधकाम उपयोगी साहित्य टाकण्यात येत आहे. यावर नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून आशा होणाऱ्या घटनेवर नगरपालिकेचे लक्ष कधी कधी होईल ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button