तीडी पिंपळगाव येथे भव्य बैलगाडा शर्यत संपन्न..

सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथे जगदंबा देवी यात्रा तथा हनुमान जयंती निमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख पवन राजे घुमरे यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते..

सेलू तालुक्यात प्रथमच ठेवण्यात आलेल्या भव्य बैलगाडा स्पर्धेमध्ये 150 होऊन अधिक बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला. या बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी अंदाजे 20,000 येवढा संख्येने लोक उपस्थित राहून पारंपारिक होणाऱ्या या खेळाचे शोभा वाढून कौतुक होऊ केले.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 41.000 हजार ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे ठेवण्यात आले होते व द्वितीय पारितोषिक रुपये 21.000 हजार रोख जगदंबा देवी संस्थान तर्फे ठेवण्यात आले होते तर तृतीय पारितोषिक रुपये 16000 माननीय प्रदीप घुमरे व अशोक भुमरे यांच्याकडून ठेवण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता म्हणून शिवशक्ती मित्र मंडळ व दुर्गेश जाधव यांचा लक्षा व पिस्तूल या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्रीमंत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सिंघम व महाराज या बैल जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. यानंतर खंडोबा प्रसन्न परभणी यांच्या सोन्या व मामा या बैल जोडीने तृतीय क्रमांक पटकावला. असे एकूण सात प्रकारचे बक्षीस या भव्य अशा बैलगाड्या शर्यतीची देण्यात आले होते.

या शर्यतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरिभाऊ काका लहाने माननीय विनायक खंडागळे शिवसेना शहर प्रमुख अजय दळवे माननीय प्रकाश जळगावकर धामणगाव सरपंच अतुल जी डक जीवन जी आवटे साईराज बोराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते व या कार्यक्रमांमध्ये समालोचन संपत वाघमोडे व पंच म्हणून अनंत बापू ढवळे यांनी काम पाहिले अतिशय शिस्तीत व शांततेत या बैलगाडा शर्यत पार पडली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button