शासकिय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सेवा संकल्प शिबिराचे आयोजन-गृहराज्यमंत्री डाँ.पंकज भोयर

सेलूत राज्य शासनाच्यावतिने आयोजीत संकल्प शिबिराचा उद्घघाटन समारंभ संपन्न
सेलू:मागील अनेक वर्षापासून केंद्र व राज्य सरकारच्या वतिने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत या सर्व योजनांची माहिती प्रत्यक्ष स्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यसाठी विकासाभिमूख नेतृत्व मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून शासनाच्यावतिने सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन गृह वशालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी केले ते येथे नूतन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर आयोजीत सेवा संकल्प शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवार ८ रोजी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर,जिल्हाधिकारी रघूनाथ गावडे,नतिशा माथूर,जिवन बेनिवाल, अध्यक्षस्थानी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर होत्या. या प्रसंगी उद्घाटक गृह राज्यमंत्री तथा वर्धा -सेलूचे आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, डॉ.नागेश लखमावर, डॉ.सदानंद भिसे,डॉ.राहुल गीते, संगीता चव्हाण, संगीता सानप, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर,विजय मोरे, डॉ.संजय हरबडे, संजय लहानकर,अमितकूमार मूंढे ,अशोक काकडे,प्रभाकर वाघीकर,दिनकर वाघ,रवि डासाळकर,भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.दत्ताराव कदम, गोविंद थिटे,शहराध्यक्ष अशोक अंभोरे, संजय लोया, भाऊ सोनवणे, शिवाजी खेडकर, अर्जुन बोरूळ,मनिष कदम, नरेंद्र दिशागत,गणेश काटकर,प्रसाद खारकर,कपिल फूलारी,अजय डासाळकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना पंकज भोयर म्हणाले की,विधानसभा निवडणूकीत मेघना बोर्डीकर यांना प्रचंड विरोध असतांना तूम्ही सर्वांनी त्यांना विधानसभेत पाठवले.तूम्हा सर्वांची दखल घेवून मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी त्यांना राज्यभर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यामूळे यापूढे तूमच्या सर्वांच्या सहकार्यांने परभणी जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचा विकास करत असतांना भविष्यात त्यांना मोठी संधी उपलब्ध होवू शकते असे भाकितही पंकज भोयर यांनी केले.

दोन लाख लखपती दिदीचे उदिष्ट ..

पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.लाडक्या बहिणींना आर्थीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी क्रेडिट सोसायटी निर्मिती करण्याचा प्रयत्न तसेच २ लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उदिष्ट लवकरच पूर्ण करणार आसल्याची ग्वाही दिली.सेलू उपजिल्हा रूग्णालयात डायलेसिस सेंटरचे उद्घाटन तसेच प्रदर्शनस्थळी उभारण्यात आलेलेल्या विविध माहिती दालनाचे उद्घाटन मंत्री पंकज भोयर व पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महिला बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करतांना संगिता चव्हाण नागपूर म्हणाल्या की,महिला बचत गटांना १ ते ५ लाख रूपये कर्ज उद्योगधंद्यासाठी शासन देणार आहे याचा आधिकाधिक बचत गटांनी लाभ घ्यावा.महिलांच्या क्रेडिट सोसायटी स्थपन करून आर्थीक स्तर उंचवावा.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रघूनाथ गावडे यांनी सेवा संकल्प शिबिरातील सर्व कार्यक्रमांचा व शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.सूत्रसंचलन किर्ती राऊत तर उपविभागीय अधिकारी संगिता सानप यांनी आभार मानले.कार्यक्रमास महिलांची लक्षणिय उपस्थिती होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button