
सेलू, जि. परभणी – परभणी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तसेच दरडोई उत्पन्न हे राज्यातील तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे, शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि विभागीय जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती मेघना दिदी साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने भव्य “सेवा संकल्प शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबीर 08 एप्रिल 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगण, सेलू, जि. परभणी येथे संपन्न होणार आहे.
शिबीराचे वैशिष्ट्य:
या तीन दिवसीय शिबिरात शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, उत्पादक पुरवठा धारक कंपन्यांची उत्पादने, जनसंवाद सत्रे, आरोग्य तपासणी शिबीर आणि विविध मार्गदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभ:
दि. 08 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता
शिबीराचे उद्घाटन मा. पालकमंत्री मेघना दिदी साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उपस्थित मान्यवर:
मा.आ. संजय केनेकर
मा. खा. अजित गोपछडे
मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर
प्रमुख कार्यक्रम:
08 एप्रिल 2025 (मंगळवार)
2:30 वाजता: महिला व बालविकास विभाग अंतर्गत “लखपती दिदी योजना” संदर्भात चर्चासत्र
वक्ता: सौ. संगीता चव्हाण, नागपूर
संध्याकाळी 7:00 वाजता: “संगीनराज” लाईव्ह ऑर्केस्ट्रा
सादरकर्ते: राजेश भावसार
09 एप्रिल 2025 (बुधवार)
सकाळी 10:00 वाजता: परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
प्रमुख उपस्थिती:
मा. ना. वि.प. सभापती श्री रामजी शिंदे
मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहजी राजे भोसले
मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर
2:30 वाजता: शेतकरी मार्गदर्शन शिबिर
विषय: कृषी, ऊर्जा व आरोग्य
मार्गदर्शक: संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ
6:30 वाजता:
दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने
मनोरंजन कार्यक्रम “
न्यू होम मिनिस्टर”
सादरकर्ते: क्रांती नाना माळेगावकर
10 एप्रिल 2025 (गुरुवार)
विविध योजना माहिती स्टॉल्स, आरोग्य तपासणी व नागरिक संवाद सत्रे सुरू राहतील.
सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
हा उपक्रम शासन आणि जनतेतील दरी कमी करून सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे..