पारंपारिक श्रीराम नवमी शोभायात्रेचे दहाव वर्ष यशस्वीरित्या उत्साहात साजरे..

मागील दहा वर्षापासून पारंपारिक रित्या चालू असलेल्य शहरांमध्ये सातत्याने चालू असलेल्या श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीतर्फे आयोजित श्रीराम नवमी शोभायात्रा चे यंदाचे दहावे वर्ष सेलूकरांच्या हजारोंच्या संख्येने उपस्थितीत यशस्वीरित्या साजरे, या शोभा यात्रेत सेलूतील राजकीय शासकीय व तसेच व्यापारी वर्गातील प्रतिष्ठित मान्यवरांनी हजेरी लावली तसेच या शोभायात्रेमध्ये वकील संघ डॉक्टर संघ तसेच युवक व युवा विद्यार्थिनींचा ही मोठा सहभाग पाहायला मिळाला,

केशवराज बाबासाहेब मंदिर इथून काढण्यात येणाऱ्या या पारंपारिक शोभायात्रेमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून प्रभू श्रीराम यांची भव्य मूर्ती सुप्रसिद्ध बाहुबली हनुमान यांचा सजीव देखावा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दरबार प्रभू श्री महाकाल यांची भव्य मूर्ती रणरागणी ध्वजपथक व लेझीम पथक बंजारा लोक नृत्य महिला व महिला भजनी मंडळ युद्ध कला लाठीकाठी दांडपट्टा प्रदर्शन 111 तोफांची सलामी म्युझिकल व्हॅन व बँड पथक या सर्व देखाव्यांनी सेलू तील नागरिकांचे मनमोहन केले . गजबजल्या वातावरणात अतिशय उत्साहात व शांततेत या श्रीराम नवमी शोभायात्रे ची सांगता केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे सामूहिक आरती करून सांगता करण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button