
संदीप भाऊ लहाने यांचे पुढाकारातून
सौजन्याने स्वर्गीय नितीन कला क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा या संस्थेच्या माध्यमातून मागे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते… त्यादरम्यान संस्थेकडून सेलू शहरांमध्ये व परिसरात होणारे मोटर सायकल चोरी व इतर चोऱ्या, घरफोड्या, रॉबऱ्या यासारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना व शरीरायुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाला मदत म्हणून सेलू शहरांमध्ये ठीक ठिकाणी बसविण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले होते..

सदरचे कॅमेरे सेलू पोलीस स्टेशन मार्फत शहरातील रायगड कॉर्नर, जिंतूर /पाथरी नाका, रेल्वे गेट, वालूर फाटा, फिल्टर पॉईंट तसेच वालूर येथील झिरो फाटा, बस स्टॅन्ड आणि इतर ठिकाणी बसविण्यात आले आहे.. सदरचे सीसीटीव्ही कॅमेरे हे सौरऊर्जेवर चालणारे असून त्याचे थेट नियंत्रण बीट अंमलदार यांचे मोबाईलवर देण्यात आले आहे..त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सेलू शहरावर लक्ष असणार आहे व पोलिसांना सेलू शहर व परिसरातील होणारे गुन्हे रोखण्यासाठी तिसऱ्या डोळ्याची मदत होणार आहे…. सेलू शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल सेलू पोलीस स्टेशन कडून संबंधित संस्थेचे आभार मानले व असेच पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी नागरिकांनी देखील आशे पाऊल उचलायला हवे..
