छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा..

सेलू (प्रतिनिधी) : शहराजवळील देऊळगावगात परिसरात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, सततच्या छेडछाड व धमक्यांना कंटाळून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही शाळेत ये-जा करत असताना मागील तीन महिन्यांपासून आरोपी कैलास विजय लोंडे (रा. अर्जुन नगर, सेलू) व त्याच्या एका अनोळखी साथीदाराकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. यामध्ये छेडछाड, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या सततच्या मानसिक त्रासामुळे व भीतीच्या वातावरणामुळे पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १७ एप्रिल रोजी दुपारी घडली.
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 204/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम 108, 352, 351(2)(3), 3(5), 78 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पुंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
समाजात संतापाची लाट या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कडक शिक्षा होणे गरजेचे असून, पालकांनीही मुलांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन वेळेवर पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button