
प्रतिनिधी सतिश आकात) दि.9 एप्रिल:
सेलू शहरात गेल्या काही दिवसांपासून डास आणि मच्छरांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेकडून नियमित धुरळणी (Fogging) आणि औषध फवारणी न झाल्याने वॉर्डावॉर्डात दुर्गंधी व मच्छरांचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे साथीच्या आजारांचे (मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया) रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, लहान मुले त्रस्त होत आहे.संध्याकाळ होताच घराघरात मच्छरांचा उपद्रव सुरू होतो. डास चावल्यामुळे लहान मुलांना मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होत आहेत, अनेक कॉलनीतील मोकळ्या जागेत साचलेले पाणी आणि उघड्या नाल्यांमुळे डासांना आमंत्रण मिळत आहे.प्रशासनाचे उदासीन धोरण स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे. केवळ कचरा साफसफाईचे दावे केले जात असताना, प्रत्यक्षात फवारणी यंत्रणा कुचकामी ठरत आहे.या वाढत्या मच्छराच्या प्रभावावर नगरपालिका कधी फवारणी करून साथीच्या आजारापासून मुक्त करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
