उंबरदरी फाट्याजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला.

सेनगाव : तालुक्यातील उंबरदरी फाट्याजवळ एक सुमारे २५ वर्षे वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन सेनगावचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाने पांढऱ्या रंगाचा Puma कंपनीचा टी-शर्ट व निळसर रंगाची नाइट लोअर पँट परिधान केलेली आहे. त्याच्या उजव्या हातावर “Sachita” तसेच डाव्या हातावर “Mom Dad” असे गोंदलेले आहे. याशिवाय एका पायावरही गोंदकाम (टॅटू) केलेले असल्याचे दिसून आले आहे.

सदर मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, अशा वर्णनाचा कोणी मुलगा हरवलेला असल्यास तात्काळ पोलिस स्टेशन सेनगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९०११०९७६६५

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button