
सेलू येथील Shree Gajanan Seva Pratishthan’s Vision English School यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणवंत कामगिरीचा गौरव करण्यासाठी ग्रँड प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, ८ मार्च २०२६ रोजी श्री साई नाट्य मंदिर, सेलू येथे होणार आहे.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा व परीक्षांमधील यशाबद्दल पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
पहिले सत्र (सकाळी ९.३० वाजता)
पहिली ते तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या सत्रात
ऑलिम्पियाड विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

My Learning Train Examination मधील पदक व पारितोषिक वितरण
दुसरे सत्र (सायंकाळी ४.३० वाजता)
केजी विभागासाठी आयोजित या सत्रात
My Learning Train Examination मधील पदक व पारितोषिक वितरण
पालकांसाठी विशेष पारितोषिक वितरण
सर्व विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण

या कार्यक्रमासाठी पालक व मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा च्या वतीने केले आहे.